नीट परिक्षेत राजस्थानचा महेश कुमार देशात पहिला
। मुंबई । दि.14 जून 2025 । राष्ट्रीय चाचणी कक्षाने वैद्यकीय पदवी प्रवेश परिक्षेचा (नीट) निकाल आज जाहीर केला. या परिक्षेत राजस्थानच्या महेश कुमार याने देशात पहिला क्रमांक मिळविला. मध्यप्रदेशमधील उत्कर्ष अवधीय याने दुसरे स्थान मिळविले तर महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी हा तिसरा आला आहे.
वैद्यकिय, दंतवैदकिय आणि वैद्यकिय पुरक अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय चाचणी कक्षाकडून नीट परिक्षा घेतली जाते. 4 मे रोजी देशातील आणि विदेशातील 5468 केंद्रावर ही परिक्षा झाली. विदेशात अबूधाबी, दुबई, बँकोक, कोलंबो, दोहा, काठमांडु, कुआलालंपूर, कुवेत, लागोत, मनामा, मस्सक, रियाध, शारजा, सिंगापूर या देशांमध्ये नीट परिक्षा केंद्र होते.
Tags:
Breaking