या बाबतची माहिती अशी की, श्रेयश पांडुरंग लटपटे (वय २३ वर्ष, रा.भायगाव ता. शेवगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, २४ एप्रिल रोजी सकाळी सुजित राजेंद्र चौधर (रा. निपाणी जळगाव, ता. पाथर्डी) याने फिर्यादीकडे माझ्याकडे असलेल्या रोख रक्कमेची रील्स बनविण्याचे सांगुन माझा विश्वास संपादन करुन मला खोटे बोलुन त्याच्या कारमध्ये ठेवलेला 31 लाख 60 हजार रोख रक्कम आणि १० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप असा एकुण ३१ लाख ७० हजार रुपयाचा ऐवज घेवुन गेला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन ठाण्यात भा. न्या सं कायदा कलम ३१६ (२) प्रमाणे दाखल केला.
या गुन्हयाचा तपास करीत असतांना सपोनि माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की,या गुन्हयात आरोपीचा भाउ अक्षय राजेंद्र चौधर याचा सदर गुन्हयात सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यावरुन एमआयडीसी पोलीसानी अक्षय उर्फ सागर राजेंद्र चौधर यास पकडले.
त्याला विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हयात चोरलेली रकमेपैकी काही रक्कम त्याचेकडे असल्याची माहिती दिली. त्यावरुन त्याचेकडुन गुन्हयात चोरलेल्या रकमेपैकी १६ लाख ५० हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे अक्षय उर्फ सागर चौधरी यास अटक करण्यात आली.
सदर गुन्हयातील सुजित राजेंद्र चौधर हा फरार असुन त्याचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधीक्षक संपत भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, पोसई विकास जाधव, पोलीस अंमलदार किशोर जाधव,नवनाथ दहिफळे, अक्षय रोहोकले, पोकॉ राजेश राठोड,भगवान वंजारी तसेच मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांचे पथकाने केली आहे.