।अहिल्यानगर । दि.16 एप्रिल 2025। अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पृथ्वीराज मोहळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्या कुस्तीत चुकीचा निर्णय दिल्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना तीन वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. या निर्णयाबाबत एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत काबलिये यांना दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांना आता तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
Tags:
Ahmednagar