एनडीए परिक्षेत नगरच्या ईशान परभाणे याचा मानाचा तुरा

। अहिल्यानगर । दि.15 एप्रिल 2025। नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी (एनडीए-एनए 2-2024) परिक्षेत नगरच्या ईशान निखिल परभाणे याने उत्तुंग यश संपादन केले आहे. ईशानने या महाकठिण परिक्षेत देशात 149 व्या स्थानावर आपले नाव सिद्ध केले आहे. या परिक्षेतून देशात 792 विद्यार्थी निवडले गेले आहेत.ईशान हा राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज, देहरादून या विद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो आरआयएमसीच्या 197 व्या बॅचचा विद्यार्थी असून जुलै 2020 च्या बॅचसाठी त्याची ऑल इंडियामधून चौदाव्या रँकवर निवड झाली होती. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

एनडीएची महाकठिण परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आता ईशानला चार वर्षांची खडतर ट्रेनिंग पार पाडावी लागणार आहे. त्यानंतर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदावर तो रुजु होईल, अशी माहिती त्याचे वडील निखिल परभाणे यांनी दिली.दरेवाडी (ता.नगर) येथील कर्नल परब स्कुलमध्ये ईशानने इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. कर्नल दिलीप परब व गिता परब यांचे त्यास मार्गदर्शन लाभले.

डिसेंबर 2019 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय इंडियन मिल्ट्री कॉलेजच्या परिक्षेत ईशानचे देशात चौदावा क्रमांक मिळविला होता. महाराष्ट्र राज्यातून दरवर्षी केवळ दोनच विद्यार्थी निवडले जातात. त्यात ईशानची निवड झाली होती. त्या परिक्षेत ईशानला चारशेपैकी तब्बल 305 गुण मिळाले होते. त्यासाठी त्यास कर्नल परब स्कुलचे संचालक कर्नल दिलीप परब यांचे लाभले होते.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

या परिक्षेतून देशातील केवळ 25 विद्यार्थी निवडले जातात. त्यातही ईशान चौदाव्या स्थानावर होता.ईशान हा येथील निखिल लाईट हाऊस व सनी इलेक्ट्रीकल्सचे संचालक तथा अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशने उपाध्यक्ष निखिल परभणे व तृप्ती परभाणे यांचा मुलगा आहे. या निवडीबद्दल ईशान व परभाणे परिवारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post