मनसे-ठाकरे गटाचे युतीचे संकेत !


| मुंबई | दि.20 एप्रिल २०२५ | गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधूनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे अशी इच्छा अनेकांकडून व्यक्त होत होती. अखेर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची युती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कारण दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र व मराठी माणसाच्या भल्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले होते.

त्यांच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी माझीसुद्धा आपसातील किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची तयारी आहे, असे ते मुंबईमधील एका कार्यक्रमा प्रसंगी ते म्हणालेत.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील युतीवर भाष्य केले आहे. आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. एका मुलाखतीत राज ठाकरेंनी यावर भाष्य केले आहे.  
 


Post a Comment

Previous Post Next Post