| छत्रपती संभाजीनगर | दि.20 एप्रिल २०२५ | महाराणा प्रतापसिंह एक राष्ट्रभक्त होते ते शेवटपर्यंत देशासाठी लढत राहिले. छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात आलेला त्यांचा पुतळा आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराणा प्रतापसिंह यांचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी प्रदिर्घ संघर्ष केला. त्यामुळे ते भारताचे जननायक म्हणून मानले जातात, छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा उभारण्यात आलेला पुतळा आजच्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे, खऱ्या अर्थाने महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा प्रेरणा व शौर्याचे प्रतिक आहे, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या कॅनॉट गार्डन येथे आज महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाले, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजय केनेकर, महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज लक्ष्यराज सिंह यांच्यासह महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत उपस्थित होते.