। अहिल्यानगर । दि.16 एप्रिल 2025। विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय मधील प्रा.कल्पना दीपक विधाते यांना इंदौर येथील ओरीएंटल विद्यापीठ येथून "कृत्रिम बुध्दिमत्ता वापरुन निवासी इमारतींचे ऊर्जा वापर, विश्लेषण आणि अंदाज" या विषयावर विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यावाचस्पती (पी.एच.डी.)पदवी प्रदान करण्यात आली.सदर अभ्यासक्रमात त्यांना इंदौर येथील ओरिएंटल विद्यापीठाचे डॉ.प्रज्ञा नेमा यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ.कल्पना विधाते यांच्या या विषयावरील रिसर्चचा अभ्यास करत असताना त्यांनी इंटरनॅशनल, स्कोपस-१, वेब ऑफ सायन्स १ व एबीडीसी-१ इत्यादी जर्नल्समध्ये एकुण ०३ पेपर प्रसिध्द केले. तसेच नॅशनल व इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांचे वरील विषयावरील एकुण ०४ पेपर्सचे पब्लीकेशन झालेले आहे.
डॉ.कल्पना विधाते यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच या सुयशाबद्दल संचालक तंत्र प्रा.सुनिल कल्हापुरे प्राचार्य डॉ.उदय नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील,प्रभारी सेक्रेटरी जनरल,डॉ. पी.एम.गायकवाड यांनी त्यांचे कौतुक केले.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग