सुगंधी तंबाखु, पानमसाला वाहतुक करणारे दोघे जेरबंद
दोन आरोपीसह ८ लाख १३ हजार ९२७ रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त
|अहिल्यानगर | दि.१६ एप्रिल २०२५ | महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखु, पानमसाला विक्रीच्या उद्देशाने वाहतुक करणारे दोन आरोपी ८ लाख १३ हजार ९२७ रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.त्या आदेशानूसार स्थानिक गुन्हे शोखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, सोमनाथ झांबरे, संतोष खैरे, बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, विशाल तनपुरे, किशोर शिरसाठ अशांचे पथक तयार करून श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले होते.
दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी पथक श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंदयाची माहिती घेत असताना, पथकास गुप्तबातमीदारामार्फत इसम नामे दिपक नाना टकले व पंकज नाना टकले (रा.काष्टी, ता.श्रीगोंदा) हे महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंध असलेली व शरिरास अपायकारक होईल असा पानमसाला व सुगंधीत तंबाखु त्यांचेकडील एमएच-१६-सीक्यु-८६७३ या वाहनामधुन श्रीगोंदा येथुन काष्टीकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासह काष्टी ते श्रीगोंदा जाणारे रोडलगत दांगड लॉन्स परिसरामध्ये सापळा रचुन संशयीत वाहनाचा शोध घेऊन, संशयीत वाहनास थांबवून वाहनातील इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी दिपक नाना टकले (वय ३१) व पंकज नाना टकले (वय २८) दोन्ही रा.इंद्रप्रस्थ पार्क, काष्टी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
पंचासमक्ष त्यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विमल, हिरा, आरएमडी कंपनीचा पानमसाला, विविध प्रकारची सुंगधीत तंबाखु मिळून आली.पथकाने आरोपीचे ताब्यातुन ८ लाख १३ हजार ९२७ रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये विमल, हिरा, आरएमडी कंपनीचा पानमसाला, विविध प्रकारची सुंगधीत तंबाखु, मोबाईल व एक सुझुकी कंपनीची इको कार एमएच-१६-सीक्यु-८६७३ असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पथकाने ताब्यातील आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता दिपक नाना टकले याने विमल व हिरा पानमसाला व त्याचे सोबतची सुगंधीत तंबाखु ही अविनाश ढवळे पुर्ण नाव माहित नाही (रा.भिगवन, इंदापूर, जि.पुणे (फरार) याचेकडून खरेदी केली आहे. तसेच आरएमडी पानमसाला व त्यासोबत सुगंधीत तंबाखु ही नौशाद सिध्दीकी पुर्ण नाव माहित नाही (रा.साळुमाळु, पारगाव, ता.दौंड, जि.पुणे (फरार) याचेकडून त्याचा कामगार, मिराज हमीद शेख, (रा.टाकळीभिमा, ता.दौंड, जि.पुणे (फरार) याचेमार्फत खरेदी केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीतांना मुद्देमालासह श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येऊन त्यांचेविरूध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुरनं ३७६/२०२५ बीएनएस २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) सह अन्न सुरक्षा मानके अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.