बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी
तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
| मुंबई | दि.25 मार्च २०२५ | बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना तात्काळ निलंबित करण्यात येईल. पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.
याबाबत सदस्य नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री आबिटकर म्हणाले, कोविड काळात झालेला भ्रष्टाचार हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नाही. या प्रकरणी सखोल चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.