कोरटकरला अखेर ठोकल्या बेड्या....


| मुंबई | दि.24 मार्च २०२५ | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्त्व्य करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सर यांना धमकी देणार्‍या प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याला तेलंगणा येथे अटक केली आहे.

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सर यांना प्रशांत कोरटकरने फोन करुन धमकी दिली होती. तसेच बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवामनकारक वक्तव्य केले होते. तेव्हापासून तो पसार झालेला होता. कोरटकर याने केलेल्या वक्तव्याबद्दल शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. तसेच विरोधकांनीही कोरटकरच्या अटकेची मागणी करत सरकारला धारेवर धरले होते.

Post a Comment

Previous Post Next Post