बांगलादेशातील हिंदुवरील अत्याचाराचा नगरमध्ये निषेध
सकल हिंदु समाजाच्यावतीने मोटारसायकल रॅली
। अहिल्यानगर । दि.10 डिसेंबर 2024 । बांगलादेशातील हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराचा नगरमध्ये सकल हिंदु समाजाने निषेध केला. यावेळी सकल हिंदु समाजाच्यावतीने शहरातून मोटारसायलक रॅली काढण्यात आली.
माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास श्री विशाल गणेश मंदिराचे संगमनाथ महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला.
त्यानंतर मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आणि माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
माळीवाडा, आशा टॉकिज, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रोड, दिल्लीगेट, बालिकाश्रम रोड, फुलारी पेट्रोलपंप, प्रोफेसर कॉलनी चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.
यावेळी माळीवाडा गणपती मंदिराचे संगमनाथ महाराज समवेत, राजाभाऊ मुळे.प. माजी सदस्य सचिन जगताप व हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.