। मुंबई । दि.11 डिसेंबर 2024 । मुंबईकरांची रेल्वेनंतर दुसरी लाईफलाईन म्हणजे बेस्ट होय. याच बेस्ट बसमधील मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकाने सोमवारी रात्री 30-40 वाहनांना चिरडले, या अपघातात तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 50 पेक्षा अधिक जण जखमी आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय मोरे याला अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने आरोपीला 11 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता अशी देखील माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कुर्ल्यातील लालबहादूरशास्त्री (एलबीएस) मार्गावरील आंबेडकरनगर भागात ‘बेस्ट’ शहर वाहतूक सेवेच्या बसने अनेक वाहनांना चिरडले. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे.
Tags:
Crime