अभिषेक कळमकर यांची मल्हार चौक, आगरकर मळा भागात प्रचार फेरी


। अहिल्यानगर । दि.11 नोव्हेंबर 2024 । विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली असून आता प्रचाराला वेग आला आहे. अभिषेक कळमकर यांनी मल्हार चौक, आगरकर मळा आणि स्टेशन परिसरातील प्रचार फेरी काढली. कळमकर यांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

कळमकर यांचे उत्फुर्त स्वागत होत असून ठिक ठिकाणी तुतारीचा आवाज घुमत असल्याचे दिसून येत आहे. अभिषेक कळमकर यांची प्रचार फेरी जशी जशी पुढे सरकत होती, तशी नागरिकांची गर्दी वाढत होती. स्थानिकांनी या फेरीत अभिषेक कळमकर यांच्याशी थेट संवाद साधला आणि आपल्या समस्या मांडल्या. 

अभिषेक कळमकरांचे विकासाचे वचन!
प्रचार फेरीत अभिषेक कळमकर यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विकासाच्या दृष्टीकोनावर प्रकाश टाकला. त्यांनी नागरिकांच्या समस्यांवर नेमके उपाय काढण्याचे वचन दिले. ही फक्त प्रचार फेरी नाही, हे तुमच्याशी संवाद साधण्याचे व्यासपीठ आहे. तुमच्या समस्या आणि गरजांवर आम्ही नक्कीच काम करू, असे त्यांनी म्हटले.

1 Comments

Previous Post Next Post