| अहमदनगर | दि. ०8 जुलै २०२४ | दूध दरवाढीसह कांदा प्रश्नावर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु केलेले जनआक्रोश आंदोलन तिसर्या दिवशी स्थगित करण्यात आले. रविवारी रात्री 12.30 च्या सुमारास तशी घोषणा करण्यात आली. खा. निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने मागील तीन दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन रविवारी मध्यरात्री शेतकर्यांच्या दूध, कांदा यांना हमीभाव देण्या संदर्भात योग्य ती कारवाई करु असे आश्वासन दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
👉दूध दरवाढीसाठी शहराच्या रस्त्यावरुन निघाली ‘ट्रॅक्टर रॅली‘
शुक्रवारी दुपारी खा. नीलेश लंके यांनी बैलगाडीतून जात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. शनिवारी सकाळपासून आंदोलन स्थळी शेतकरी जमण्यास सुरूवात झाली. शेतकरी येताना गायी, म्हशीही असे पशुधन घेऊन आले होते. तर रविवारी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकर्यांनी नगर शहरातून काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमुळे चक्का जाम होऊन वाहतूकीची कोंडी झाली होती. रविवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील नगरमध्ये आंदोलन स्थळी दाखल झाले होते.
👉शेतकरी, जनावरांसह खा. निलेश लंके यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन!
यावेळी राजेंद्र फाळके, अभिषेक कळमकर, किरणे काळे, रोहिदास कर्डिले, योगीराज गाडे, बाळासाहेब हाराळ, सर्देश कार्ले, प्रकाश पोटे, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, संदीप कर्डीले, शिवशंकर राजळे, गहिनीनाथ शिरसाठ, अर्जुन भालेकर, खंडू भुकन, केशव बेरड, मंदार धिवरे, वैभव गायधन, शंतनु दिंडे, सागर वाबळे, किसनराव लोटके, सुवर्णा धाडगे, पुनम मुंगसे, रामदास भोर, बाळासाहेब खिलारी, ओमकार सातपुते, डॉ. सचिन औटी, बाळासाहेब नगरे, सतिश भालेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
👉खा. नीलेश लंके यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट
पाटलांनी घेतला कार्यकर्त्यांसमवेत भोजनाचा आनंद
तीन दिवसाचे आंदोलन अखेर पालकमंत्र्याच्य आश्वासनानंतर स्थागित करण्यात आले. दरम्यान आंदोलन स्थगित झाल्यानंतर सर्वच आंदोलनकर्त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. पारनेर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून स्वयंपाक करून आंदोलनकर्त्यांना जेवण आणले होते. आंदोलन स्थगित झाल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंदोलन कर्त्यांबरोबरच जेवणाचा आस्वाद घेतला. पाटील याांनी पाण्याच्या जारचाच टेबल बनवत भोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या जेवणाची आंदोलनस्थळी चांगलीच चर्चा रंगली होती.

