| अहमदनगर | दि.०5 जुलै २०२४ | शेतकर्यांच्या दुधाला 40 रुपये लिटरप्रमाणे भाव द्यावा, तसेच अनुदान मिळण्यासाठी अनेक जाचक आटी आहेत. यामुळे 5 टक्के शेतकर्यांना अनुदान मिळत नाही, आमच्या कष्टाचे आम्हाला द्या, दुधाला 40 रुपये भाव द्या, गुजरातमध्ये दुधाला 45 रुपये भाव मिळत आहे. त्या प्रमाणेच महाराष्ट्रात देखील दुधाला भाव देण्यात यावा, सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर मुंबईत शेतकरी जनावरांसह आंदोलन करतील असा इशारा खासदार निलेश लंके यांनी आंदोलन प्रसंगी दिला आहे.
दूध तसेच कांद्याच्या दरासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या आंदोलनात हजारो शेतकर्यांसह जनावरांचाही या आंदोलनात सहभागी झाले आहे. आंदोलक कार्यालयाबाहेर पोहचल्यानंतर घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दुमदुमले होते.
दरम्यान, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने खा. लंके यांनी शेतकर्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या दिला आहे. दरम्यान खा.लंके यांच्याशी चर्चा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील हे आंदोलनस्थळी आले होते. मात्र हे प्रश्न शेतकर्यांच्या संबंधित व गांभीर्याचे असल्याने चर्चेसाठी जिल्हाधिकार्यांनीच यावे या भूमिकेवर लंके ठाम राहिल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी बाबासाहेब भोस, महादेव राळेभात, राजेंद्र आघाव, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, किरण काळे, किरण कडू, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, संदीप कर्डीले, प्रकाश पोटे, शिवशंकर राजळे, केशव बेरड, शरद बडे, किसनराव लोटके, पुनम मुंगसे, रामदास भोर, अप्पासाहेब शिंदे, नवनाथ रासकर, योगेश मते, डॉ. सचिन औटी, बाळासाहेब नगरे, सतिश भालेकर, रविंद्र राजदेव, श्रावण काळे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.
दुधाला बाजारभाव मिळालाच पाहिजे, कांद्याला बाजारभाव मिळालाच पाहिजे, नाकर्त्या सरकारने केलाय वांधा, मातीमोल विकतोय दुध व कांदा, शासनाचा आदेश घडोघडीला शेतकरी लावलांय देशोधडीला अशा अशायाचे फलक मोर्चेकर्यांच्या हातात होते. मी शेतकरी असे लिहिलेल्या टोप्या परीधान केलेले आंदोलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
गृहमंत्री आणि दुधाचा काय संबंध ?
पालकमंत्र्यांना शेतकर्यांची जाण असेल तर त्यांनी दुधाला हमीभाव देणे गरजेचे आहे. पालकमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली, दुधाचा आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा संबंध काय ? दुधाच्या प्रश्नासंदर्भात मी सुप्रियाताई सुळेंंसह पियुष गोयल यांना भेटलो. गोयल यांनीही हा प्रश्न राज्य पातळीवरील असल्याचे सांगितले. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. चुकीच्या बातम्या प्रसारीत करून धुळफेक करणे हे आता चालणार नाही.- खासदार नीलेश लंके
आऊटपुट घेऊनच जाणार
आमच्या आंदोलनाकडे जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. आम्हाला हात जोडता येतात आणि बाह्या देखील वर करता येतात. शेवटी आमचे नाते शेतकरी, सर्वसामान्य जनतेशी आहे. आम्ही जिल्हाधिकार्यांच्या दारात आलो आहोत, येथून आऊटपुट घेऊनच जाणार असल्याच
