| अहमदनगर | दि.30 जुलै 2024 | पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये शनिवारी व रविवारी धडक मोहिम राबविली आहे. जिल्हयातील ऑनलाईन बिंगो, जुगार, अवैध देशी, विदेशी, गावठी दारु अड्डे अशा 16 ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत 22 आरोपींना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक
पोलस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकत्याच घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेसह सर्वच पोलस ठाण्यांच्या प्रमुख अधिकार्यांना जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांनी त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या द्वारे दोन दिवस विशेष मोहिम राबविली. या मोहिमेत जिल्ह्यात 16 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे.
लाच मागितल्या प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकार्यांवर...
यामध्ये किसन संजय कांबळे (रा.सोळातोटी कारंजा, नगर), नितीन राजन्ना भिंगारे (रा.राज चेंबर मागे, मंगलगेट, नगर), राजेंद्र विलास पवार (रा.लिंपणगांव ता.श्रीगोंदा), मयुर दिलीप कांबळे, वेंकटेश रामचरण सोनकरीवालर (रा.श्रीगोंदा कारखाना, ता.श्रीगोंदा) , ऋषीकेश शरद राक्षे (रा.गव्हाणवाडी, ता.श्रीगोंदा), राधेशाम शिवशंकर तिवारी (रा.देवदैठण, ता.श्रीगोंदा), बिराजदार धोंडीबा कर्हाडे (रा.गव्हाणवाडी, ता.श्रीगोंदा) यांच्या विरुध्द अवैध गावठी देशी दारु विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आजोबासह तीन वर्षाच्या नातवाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
इम्राण अब्दुल रहिम शेख, युनूस चाँद शेख (रा.कुकाणा, ता. नेवासा), उत्तम दौलत कोल्हे (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव), संदीप भाऊसाहेब मोरे (रा.बत्तरपुर, शेवगाव), सुरेश लक्ष्मण नजन, रामेश्वर भरतरी नजन, भारत बाबासाहेब चोपडे (तिन्ही रा.भातकुडगांव, ता.शेवगाव) यांच्या विरुध्द ऑनलाईन जुगार प्रकरणी गुन्हे दाखल करुन 1 लाख 25 हजार 740 रोख रक्कम, साधने, 1 सॅमसंग, 3 विवो, 1 रेडमी कंपनीचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
मोटारसायकल चोरणारी दुसरी टोळी जेरबंद
गणेश विष्णु आंधळे (रा.सोनसांगवी, ता.शेवगांव), शौकत दिलदार शेख (रा.राक्षी, ता.शेवगाव), ऋषीकेश उध्दव पातकळ (रा. चापडगांव, ता.शेवगाव), ज्ञानेश्वर आण्णा उरुणकर (रा.मिरी, ता.पाथर्डी) राजु जनार्धन सातपुते (रा.साकेगांव, ता.पाथर्डी) यांच्यावर अवैध देशी, विदेशी, दारु विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करुन मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत.
