| अहमदनगर | दि.26 जुलै 2024 | राहुरी तालुयातील मोटारसायकल चोरी करणारी दुसरी टोळी पोलिसांच्या हाथी लागली असुन मोटार सायकलची चोरी करणार्या ७ जणाच्या टोळीतील ५ आरोपींना गजाआड करण्यात राहुरी पोलिसांना यश आले असून यातील ३ आरोपी चोरीच्या मोटारसायकलचे सुटे भाग करुन विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. ते तिघे मोटारसायकल गॅरेज मालक आहेत. या टोळीकडून ७ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या मोटरसायकलच्या चोरींवर प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने तसेच चोरीस गेलेल्या मोटरसायकल शोधकामी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मागील आठवड्यात विजपंप चोरीतील पाच आरोपींकडून ११ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. खबर्या मार्फत मोटारसायकल चोरीच्या दुसर्या टोळीची माहिती मिळाल्या नंतर सीसीटीव्ही फुटेज वरुन खात्री करुन घेतल्या नंतर
राहुरी पोलिसांनी मोटरसायकल चोरणारे विशाल प्रभाकर साठे व बबलू बाळासाहेब बर्डे (रा.ब्राह्मणी ता.राहुरी) यांना ताब्यात घेतल्या घेवून चौकशी केली असता सुरवातीला उडवाउडवीचे उत्तर दिल्याने पोलिसांनी पोलिस खाया दाखवताच दोन्ही आरोपींनी मोटारसायकल चोरी गुन्हा कबुल करुन ७ मोटारसायकली पोलिसांना काढुन दिल्या आहेत. चोरलेल्या मोटारसायकलचे सुटे भाग करुन इतर मोटारसायकला बसविण्याचे काम करणार्या ३ गँरेज चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्यामध्ये रवी राघू सूर्यवंशी, कोहिनूर सोपान पवार, सोमनाथ सुरेश वैरागर,(सर्व रा.ब्राह्मणीता. राहुरी) यांचा समावेश आहे. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन व तिन गँरेज चालक अशा पाच जणांना अटक करुन राहुरी न्यालयात हजर केले असता न्यायालयाने ६ दिवसाची पोलिस कस्टडी दिली आहे.दरम्यान अटक केलेल्या सात आरोपीकडून सात मोटरसायकली ज्यांचे नंबर इंजिन नंबर , चेसिस नंबर वेगवेगळे असलेल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अशोक रखमाजी पिंपळे (रा.मानोरी ता.राहुरी), कृष्णा संजय वैरागर (रा.ब्राह्मणी ता.राहुरी) यांचा राहुरी पोलीस शोध घेत आहेत.
