पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक

| पॅरीस | दि.29 जुलै 2024 | पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारताने रविवारी प्रथम पदक पटकावले असून, मनू भाकरने नवा विक्रम प्रस्थापत केला आहे. भारताच्या मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला हे पहिले कांस्यपदक मिळाले आहे.

भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. मनूने तिने अंतिम फेरीत २२१.७ गुणांसह कांस्यपदक  जिंकले. २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूचे पिस्तूल खराब झाले होते. तिला २० मिनिटे लक्ष्य करता आले नाही. पिस्तूल दुरुस्त केल्यानंतरही मनूला केवळ १४ शॉट्स मारता आले आणि ती अंतिम शर्यतीतून बाहेर पडली.

मनू निराश झाली होती पण तिने कमबॅक केले आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकले. कोरियाच्या ओ ये जिनने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तिने २४३.२ गुण  मिळवून ऑलिम्पिक विक्रम केला. कोरियाच्या किम येजीने रौप्यपदक जिंकले. तिने २४१.३ गुण मिळवले.

Post a Comment

Previous Post Next Post