लाच मागितल्या प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल


| अहमदनगर | दि.26 जुलै 2024 | प्लॉटच्या फेरफार नोंदी ऑनलाईन अपलोड केल्याच्या मोबदल्यात लाच स्वीकारल्याची मान्य केल्याचे समोर आले आहे. सावेडीचे तलाठी सागर एकनाथ भापकर व मंडलाधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आजोबासह तीन वर्षाच्या नातवाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

44 हजारांपैकी 40 हजार रुपये घेण्याचे ठरले होते. तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या संयुक्त नावे सावेडी येथे 18 हजार चौरस फूटचा प्लॉट आहे. सदर प्लॉटचे अहमदनगर महानगरपालिका यांच्याकडील शासकीय रेखांकन करून सदर प्लॉटचे बांधकाम करण्याकरीता 22 स्वतंत्र उपविभागणी केली आहे. 

खा. नीलेश लंके यांचे उपोषण मागे

तलाठी भापकर यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या 22 प्लॉटच्या फेरफार नोंदी ऑनलाइन अपलोड केल्याच्या मोबदल्यात 44 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली 

मोटारसायकल चोरणारी दुसरी टोळी जेरबंद

आणि मंडलाधिकारी देवकाते यांनी तक्रारदार यांच्याकडून सदर प्लॉटच्या फेरफार नोंदी मंजूर करण्यासाठी 44 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य करून भापकर यांच्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे 22 प्लॉटचे 11 हजार रुपये लाचेची मागणी केली आहे.

महसूल कर्मचाऱ्यांचा संप मागे 

Post a Comment

Previous Post Next Post