👉जिल्हा परिषदेच्या घंटागाडी खरेदीत भ्रष्टाचार!
नुकत्याच झालेल्या आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक या दोन बँकांचा कॅम्पस इंटरव्यू आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड चाचणी, प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून जे काही प्रश्न विचारले त्यामध्ये २५ विद्यार्थी पात्र ठरले. पात्र विद्यार्थ्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. ग्रामीण भागातील गरीब व होतकरू कुटुंबातील या विद्यार्थ्यांना निश्चितच या निमित्ताने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ मिळणार आहे.
👉जिल्हा परिषदेत घाणीचे साम्राज्य; दर्जाहीन ठेकेदारी चव्हाट्यावर!
कॅम्पस इंटरव्यूच्या आयोजनामध्ये डॉ. हरीश दुबे, प्रा.आप्पासाहेब शेळके हे सातत्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध कंपन्यांना आमंत्रित करत असतात त्यातून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट होत असते. या निवड झालेल्या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना.राधाकृृष्ण विखे पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ शिक्षण संचााालक डॉ.प्रदिप दिघे ,शिक्षण संचाालिका सौ.लिलावती सरोदे कॅम्प संचालक डॉ.आर.ए.पवार यांनी अभिनंदन केले आहे.
👉30 जुनपर्यंत ई-केवायसी करुन घेण्याचे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आवाहन
