जिल्हा परिषदेच्या घंटागाडी खरेदीत भ्रष्टाचार!

जिल्हा परिषदेच्या घंटागाडी खरेदीत भ्रष्टाचार!

भाजपचे जालिंदर वाकचौरे यांची ग्रामविकासमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी

| अहमदनगर |  दि.28 जुन 2024 |  अहमदनगर जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या घंटा गाडी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे भाजपा माजी गटनेता जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. 10 कोटी रुपये रकमेचा अपव्यय झाला असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामविकासमंत्री यांच्याकडे केली आहे.

👉  खासदार निलेश लंके रिक्षातून थेट शरद पवारांच्या भेटीला !

जिल्हा परिषदेने 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून इलेक्ट्रीक घंटागाड्या घेतल्या. या घंटागाड्यांची निविदा पारदर्शक नसल्यामुळे जवळपास 190 गाड्या व 10 कोटी रुपये त्यावर खर्च करण्यात आले. परंतु, घंटागाड्या अधिकृत डिलर तसेच कंपनीकडून न घेता त्या असेंबल करून गावोगावी देण्यात आल्या आहेत.

👉  जिल्हा परिषदेत घाणीचे साम्राज्य; दर्जाहीन ठेकेदारी चव्हाट्यावर!

दोन ते तीन महिन्यांत या संपूर्ण गाड्या बंद पडल्या आहेत. यामध्ये 10 कोटी रुपये रकमेचा अपव्यय झाला असून ही सर्व रक्कम पाण्यात गेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीत अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे वाकचौरे यांची ग्रामविकासमंत्री यांच्याकडे केली आहे.

👉 शेतकर्‍यांना पीककर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये : मुख्यमंत्री 

Post a Comment

Previous Post Next Post