जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
मराठा पतसंस्थेचे उपक्रम नेहमीच समाजाहित जोपासणारे : डॉ.मच्छिंद्रनाथ तांबे
। अहमदनगर । दि.05 जानेवारी 2024 । आपली दिवसाची सुरुवात ही दिनदर्शिका पाहूनच होत असते, त्यातून नियोजन होत असल्याने आपली कामे चांगल्याप्रकारे मार्गी लागत असतात. मराठा पतसंस्थेचे उपक्रम नेहमीच समाजाहित जोपासणारे असतात. पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक शिस्त लावून, त्यांच्या गरजेवेळी मदतीचा हात देत, त्यांची प्रगती साधत आहे. महिला, उद्योजक, व्यवसायिकांना कर्जरुपी मदतीतून त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. दिनदर्शिकेच्या माध्यमातून वर्षभर लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न होत आहे. ही दिनदर्शिका नसून दिशा दर्शिका आहे, असे प्रतिपादन राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.मच्छिंद्रनाथ तांबे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ.मच्छिंद्रनाथ तांबे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष इंजि.विजयकुमार ठुबे, शिक्षक नेते निवृत्ती कानवडे, उपाध्यक्ष किशोर मरकड, संचालक ज्ञानदेव पांडूळे, लक्ष्मणराव सोनाळे, सतिश इंगळे, बाळकृष्ण काळे, किसनराव पायमोडे, कालिदास शिंदे, उदय अनभुले, इंजि.संभाजी मते, द्वारकाधिश राजेभोसले, इंजि.बाळासाहेब सोनाळे, अॅड.राजेश कावरे, राजेंद्र ढोणे, अच्युत गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड आदिंसह कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष किशोर मरकड यांनी पतसंस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कावरे यांनी केले तर आभार उदय अनभुले यांनी मानले.
