। अहमदनगर । दि.27 ऑक्टोबर 2023 । माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे वयाच्या 86 व्या वर्षी नगर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. बबनराव ढाकणे हे महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे नवव्या लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता. दिवंगत ढाकणे यांच्या मागे मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे.
बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा यशाचा टप्पा राहिला आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्राम विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते ऊर्जा राज्यमंत्री होते.
बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थी दशेतच थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची 1951 मध्ये भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन ठरले. गोवामुक्ती सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तसेच पाथर्डी तालुक्यातील विकासाबाबत विधानसभेत जाऊन पत्रके भिरकावली होती. बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले.
Tags:
Ahmednagar
