‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हाध्यक्षपदी भागा वरखडे
सुहास देशपांडे, प्रा. सुभाष चिंधे कार्याध्यक्ष
। अहमदनगर । दि.19 ऑक्टोबर 2023 । ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेची नगर जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांची बैठक झाली. त्यात कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. प्रारंभी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष म्हणून भागा वरखडे (कार्यकारी संपादक लोक आवाज) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सुहास देशपांडे, प्रा. सुभाष चिंधे यांची कार्याध्यक्ष म्हणून, तर विकास अंत्रे, सचिन धर्मापुरीकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली.
कार्यकारिणी अशीः
सुहास देशपांडे (निवासी संपादक, नगर सह्याद्री), प्रा. सुभाष चिंधे (संपादक, नगर स्वतंत्र कार्याध्यक्ष), विकास अंत्रे ( वृत्तसंपादक, पुण्यनगरी), सचिन धर्मापुरीकर, वरिष्ठ उपसंपादक, लोकमत (उपाध्यक्ष), चंद्रकांत शिंदे, लोकआवाज (सरचिटणीस) मुरलीधर तांबडे, उपसंपादक, प्रभात (सहसचिव), राजेंद्र त्रिमुखे, जिल्हा प्रतिनिधी, सरकारनामा (संघटक), दौलत झावरे, उपसंपादक, सकाळ (कोषाध्यक्ष), प्रदीप पेंढारे, ऑनलाईन न्यूज एडिटर, (प्रवक्ता)
बालकुणाल अहिरे, निवासी संपादक, लोकमंथन (प्रसिद्धी प्रमुख), अतुल लहारे, संपादक, सा. विजयमार्ग, संतोष आवारे, लोकशाही.आघाडी चॅनेल, तेजस शेलार, अहमदनगर लाईव्ह, बिलाल पठाण, उपसंपादक, नायक, वाजिद शेख (सर्व कार्यकारिणी सदस्य)
