मराठा आरक्षणासाठी 13 सप्टेंबरला कायनेटीक चौकात रास्तारोको

मराठा आरक्षणासाठी बुधवारी कायनेटिक चौकात रास्तारोको

मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

। अहमदनगर । दि.11 सप्टेंबर 2023 ।  मराठा समाजाला ५० टक्केच्या आतून ओबीसीमधून आरक्षण मिळावे, मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा तसेच आंदोलन कर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने १३ सप्टेंबर २०२३ रोजी कायनेटिक चौेक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी जालना येथील अंतरवली सराटी येथे गेल्या ११ दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी, मराठा समाजाला ५० टक्क्याच्या आतून ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी तसेच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाज अत्यंत आक्रमक झालेला असून मनोज जरांगे यांनी सुमारे 14 दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाची म्हणावी तशी दखल शासन घेत नसल्याने मराठा समाज प्रचंड अवस्थ झालाय त्यामुळेच अहमदनगर येथील सकल मराठा तसेच मराठा क्रांती मोर्च्या च्या वतीने बुधवारी कायनेटिक चौक येथे सकाळी 11 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

या निवेदनावर निलेश म्हसे,संजय चव्हाण, सचिन जगताप सुरज ठोकळ, किशोर वाघ, राहुल घोडके, गिरीष भांबरे, उदय अनभुले, सुरेश इथापे ऋषिकेश सोमवंशी, विलास तळेकर, गजेंद्र दांगट, मयूर पवार, राजेंद्र कर्डिले, अभय शेंडगे, नितीन गव्हाणे, परमेश्वर पाटील, विजय तिवारी, राजेश सरमाने, सुरेश मिसाळ, संदिप जगताप, अनिकेत आवारे, श्रीपाद पठाडे, विलास तोडमल, उद्धव गागरे,रवी भूतकर,अमोल हुंबे, आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post