दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : शिवसेना


। अहमदनगर । दि.08 ऑगस्ट 2023 । महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन नगरमध्ये समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयतन केला जात आहे. या घटनांचे पडसाद राज्यभर उमटत असून, अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे. दोषी व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. जर शासनाने अशा प्रवृत्तींना रोखले नाही तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करु, असा इशाराही देण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करुन त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगरमध्ये तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेनेच्या वतीने दुचाकी रॅली काढून निषेध नोंदविण्याचे जाहीर करण्यात आले होते.

सोमवारी सकाळी शहरातील एस.टी.स्टॅड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करुन दुचाकी रॅलीस प्रारंभ करण्यात आला. शहराच्या विविध भागातुन ही रॅली काढण्यात आली. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, गणेश कवडे, अनिल बोरुडे, नगरसेवक श्याम नळकांडे, संजय शेंडगे, सचिन शिंदे, विजय पठारे, योगिराज गाडे, दत्ता जाधव, आशा निंबाळकर, स्मिता अष्टेकर, अरुणा गोयल, संतोष गेणप्पा,  संग्राम कोतकर, दत्ता कावरे, हर्षवर्धन कोतकर आदी सह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post