शिर्डीतील पिंपळगाव रोड येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त!

।  शिर्डी । दि.03 ऑगस्ट  2023 ।  शिर्डी शहरालगत असलेल्या पिंपळगाव रोड येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणार्‍या बंगल्यावर छापा एका पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच, दोन आरोपींना अटक करण्यात आली ओह. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार

शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडी रोड येथील बंगल्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली आहे. 

मुंबई येथे मनोरा आमदार निवास बांधकामाचा शुभारंभ

दौलत किसन लटके, अंकुश संजय घोडके या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

महसूल हा शासनाचा महत्त्वाचा विभाग : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

शिर्डी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चालत असलेल्या अनैतिक व्यवसायावर केलेल्या कठोर कारवाईमुळे साई भक्तांनी आणि शिर्डीकरांनी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांचे कौतुक केले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, गुलाबराव पाटील, इरफान शेख, कुर्‍हे, शिंदे, जाधव, भांगरे, गांगुर्डे यांनी केली.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या 

Post a Comment

Previous Post Next Post