प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या


। मुंबई । दि.02 ऑगस्ट  2023 । हिंदी चित्रपटसृष्टीत अत्यंत यशस्वी अशा मोजक्या मराठी नावांपैकी एक असलेले प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

नितीन चंद्रकांत शेळके यांचे वय 58 वर्षांचे होते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला होता. प्राथमिक माहितीनुसार, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचार्‍यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले.

कर्मचार्‍यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती.

Post a Comment

Previous Post Next Post