। मुंबई । दि.03 ऑगस्ट 2023 । पावसाळी अधिवेशनातच विरोधीपक्ष नेत्याची घोषणा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आज काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राहुल नार्वेकर यांनी तशी घोषणा केली आहे.
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
शिवसेना
आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर विधानसभेत सर्वात मोठा पक्ष
ठरलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसनं विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या
नावाची घोषणा केली आहे. विदर्भातील आक्रमक नेते विजय वडेट्टीवार यांची या
पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
दिव्यांग कल्याण विभागातील १९१२ पदे भरण्यास मान्यता
शिवसेना
आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार
कोसळल्यानंतर विरोधी बाकांवर बसलेल्या आघाडीनं वर्षभरापूर्वी अजित पवार
यांची विरोधी पक्षनेते पदी निवड केली होती. मात्र, अजित पवार यांच्याच
नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानं विधानसभेत
विरोधी पक्षनेता नव्हता.
महिला स्वयंसहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य
संख्याबळानुसार
काँग्रेसनं या पदावर दावा केला होता. शिवसेना वा राष्ट्रवादी काँग्रेसनं
त्यास हरकत घेतली नाही. यानंतर आज विजय विडेट्टीवार यांच्या नियुक्तीची
घोषणा करण्यात आली आहे. निवडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण
आदींसह अनेकांनी अभिनंदन केले.
