ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन



। मुंबई । दि.09 ऑगस्ट  2023 । ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून हरी नरके यांनी चळवळ सुरू केली होती. मराठी भाषा ही 2500 वर्षांहून अधिक जुनी असल्याचे पुरावेही त्यांनी मांडले होते. समता परिषदेचे ते उपाध्यक्षही होते.

हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि  शासकीय पातळीवर वेगाने  निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post