मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू

 

। मुंबई । दि.15 जुलै 2023 । प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी काल शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत मृतावस्थेत सापडले. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते. मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी 77 वर्षाचे होते.

महाजनी यांनी चित्रपट दिग्दर्शक व निर्माता म्हणूनही काम केले आहे. त्यांनी 1997 सालच्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटाची दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना यांना मराठी सिनेविश्वात पहिली संधी मिळाली. 

शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी त्यांना संधी दिली. 1974 साली आलेला हा मराठी चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तरूण तारा मराठी सिनेसृष्टीला मिळाला.

Post a Comment

Previous Post Next Post