। अहमदनगर । दि.05 जुलै 2023 । अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन मागील एक वर्षापासून पसार असणार्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली. सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण, रणजित मारग, सचिन रणशेवरे, पोकॉ कमलेश पाथरुट, राहुल गुंडू, नितीन शिंदे, संभाजी बोराडे, विक्रांत भालसिंग, सायबर सेलचे सुभाष थोरात, राजु खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती
सपोनि देशमुख यांच्या सूचनेवरून पथकाने बदलापूर, पनवेल, मुंबई येथे जावून चौकशी केली. त्यादरम्यान पथकाला माहिती मिळाली की, आरोपी हा सोशल मिडीयाचा वापर करीत आहे.त्यानुसार सदर पथकाने सायबर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे व पोकॉ राहूल गुंडू यांची मदत घेऊन तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी हा काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे वास्तव्य करीत आहे, अशी माहिती मिळाली.
अपहरण करुन रस्तालूट करणारी टोळी मुद्देमालासह जेरबंद
त्यानुसार पथकाने तात्काळ काठापूर बुद्रुक येथे जाऊन आरोपी व पिडीत मुलीचा शोध घेतला असता, सदर आरोपी व पिडीत मुलगी त्यांचे नाव बदलून एका शेतामध्ये कामगार म्हणून राहत आहेत, अशी माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शेतात जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. सुहास घनश्याम बोठे (वय 22, रा. वाळकी, ता.जि. नगर) असे त्याचे नाव आहे. आरोपी बोठे यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बीआरएस मध्ये महाराष्ट्राचा कायापालट करण्याची क्षमता : संतोष वाडेकर
