काळ्या काचा असणार्‍या 115 वाहनांवर कारवाई

 

। अहमदनगर। दि.28 जुलै 2023 । केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 100 नुसर वाहनांच्या समोरील आणि पाठीमागील काचा 70, तर दोन्ही बाजूच्या काचा 50 टक्के पारर्शक असाव्यात असा नियम आहे. परंतु  वाहनचालक अथवा मालक या नियमाचा भंग करत असल्याने पोलिसांनी नगरमध्ये 115 वाहनांवर कारवाया केल्या आहेत. 

मोहरम मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर काचांवर काळी फिल्म चिकटवून फिरणार्‍या वाहनांची तपासणी करुन नगरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. पुढील काळात देखील ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे.

घोसपुरी पाणी योजनेच्या अध्यक्षपदी रवींद्र कडुस बिनविरोध

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु केली आहे. या दरम्यान विना नंबरप्लेट, वाहतूक नियमांचे उल्लंघन, काळ्या काचा लावलेल्या  वाहनांची तपासणी करुन दंड करण्यात आला आहे. शहरामध्ये ठिक ठिकाणी नाकाबंदी करुन ही कारवाई करण्यात येत आहे.

सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार : मंत्री उदय सामंत


Post a Comment

Previous Post Next Post