मोहरम मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर


। अहमदनगर। दि.28 जुलै 2023 । मोहरमच्या मिरवणूक मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यामध्ये चौका चौकात कॅमेर्‍याची नजर राहणार आहे. त्याच बरोबर महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतुक इरत मार्गाने वळवण्यात आली आहे.

मोहरमच्या पार्श्वभूमतीवर मिरवणूक मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोहरमच्या बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधीक्षक 4, पोलीस निरिक्षक व सहाय्यक पोलिस निरिक्षक 45, महिला कर्मचारी 654 असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

शहरातील अनेक भागात भरारी पथके तसेच फिक्स पॉईट लावण्यात आले तसेच शहरात येणार्‍या सर्व महामार्गावर नाकाबंदी करुन वाहांची तपासणी करण्यात येत आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतुक इरत मार्गाने वळवण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post