। अहमदनगर । दि.27 जुलै 2023 । नगर तालुक्यातील घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या अध्यक्षपदी माजी पंचायत समिती सदस्य रवींद कडुस यांची गुरुवारी (दि.२७) दुपारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नगर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्या अध्यक्षतेखाली घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समितीच्या अध्यक्षनिवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये घोसपुरी पाणी योजना समितीच्या अध्यक्षपदासाठी रविंद्र कडूस यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाली.
दरम्यान, गुरुवारी सकाळी ११ वाजता भाजप पदाधिकारी व घोसपुरी योजनेच्या सदस्यांची भाजप नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये घोसपुरीच्या अध्यक्षपदासाठी रविंद्र कडूस यांच्या नावावर एकमत झाले. त्यानुसार रविंद्र कडूस यांचा अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला.
निवडीनंतर भाजप पदाधिकार्यांनी कडूस यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी सभापती अभिलाष घिगे, सरपंच शरद बोठे, बाजार समिती संचालक सुधीर भापकर, दादाभाऊ चितळकर, सरपंच प्रविण कोठुळे आदींसह सदस्य उपस्थित होते.
