उमेश देवकर एलएलबी परिक्षेत द्वितीय


। अहमदनगर। दि.28 जुलै 2023 ।  एलएलबी. परीक्षेत सी.डी.देशमुख लॉ कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांकाने यशस्वी झाल्याबद्दल उमेश देवकर यांच्यासह प्रथम क्रमांक प्राप्त तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

यावेळी कॉलेजचे सचिव साठे सर व कॉलेजचे प्राचार्य बेग सर यांनी पेढा भरवून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आपल्या देशाचे सर्वोच्च संविधान भेट देऊन सन्मान केला. त्याप्रसंगी कॉलेजच्या प्राध्यापिका जानराव मॅडम, कॉलेजचे प्राध्यापक गनबोटे सर, प्रथम क्रमांक प्राप्त कु.वैष्णवी ताकवणे व उत्तीर्ण विद्यार्थी पाटस्कर सर ई. उपस्थित होते. कु.वैष्णवी ताकवणे यांचा देखील सत्कार करण्यात आला.

देवकर यांनी सहकार क्षेत्रांत ऑडिटर्स म्हणुन तसेच अनेक संस्थांचे मार्गदर्शक म्हणूनही यशस्वी काम केलेले आहे,  उमेश देवकर यांनी सहकार क्षेत्रामध्ये यशस्वी काम केल्यानंतर सी.डी.देशमुख विधी महाविद्यालयातून विधी विभागाची (एलएलबी) या तीन वर्षाची पदवी परीक्षेत यशस्वी होऊन पदवी प्राप्त केली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post