शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा

 शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा

। जिजाऊ प्रतिष्ठाणच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी , पेढे वाटप

। अहमदनगर। दि.07 जून ।  छत्रपती शिवाजी महाराज यांचा 349 वा शिवराज्याभिषेकदिन नगर शहरात राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटप करण्यात आले. 

 अंबिका महिला बँकेचे अध्यक्षा सौ आशा मिस्कीन यांना सेवाश्री पुरस्कार

यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. पेढेवाटपानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शाहिर खराडे यांनी शिवराज्याभिषेक पोवाडा सादर केला. 

थांबवा फसवणुकीचा प्रकार; अपडेट करा ‘आधार’ 

यावेळी प्रतिष्ठाणचे सदस्य संजय चव्हाण, राजेंद्र ससे, निलेश म्हसे, पप्पु गिते, दत्ता साठे, सुनिल जरे, महेश बागल, मिलिंद जपे, सचिन जगताप, रवि भुतकर, श्रीपाद दगडे, अतुल लहारे, हरकु मगर, उदय अनभुले, सतिष इंगळे, बापुराजे भोसले, रामदास वाघ, अशोक कुटे, हेमंत मुळे, बबलु ससे, अकोलकर, मिलिंद भालसिंग आदीसह प्रतिष्ठाणचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संघर्षातून मिळालेले यश प्रेरणादायी : सुधीर भापकर 

Post a Comment

Previous Post Next Post