। अहमदनगर । दि.3 मे 2023 । केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा व सौंदर्यकरण स्पर्धेमध्ये अहमदनगर महानगरपालिकेने भाग घेतला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. त्यामुळे आपले शहर स्वच्छ सुंदर राहण्यास मदत होते.
कामगारदिनी महावितरणच्या ६९ यंत्रचालक व तंत्रज्ञांचा गौरव
नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या सौंदर्यीकरण स्पर्धेमध्ये अहमदनगर महानगरपालिकेचा राज्यामध्ये तिसरा क्रमांक आला आहे. आता नागरिकांमध्ये वृक्षाबाबतचे प्रेम अधिक घट्ट व्हावे, वृक्षाचे महत्त्व पटावे यासाठी शहरातील काही झाडांची रंगरंगोटी केली जात आहे. त्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यीकरण व सुशोभीकरणांमध्ये भर पडणार आहे.
धरणामध्ये लावलेल्या इलेक्ट्रिक मोटारची चोरी
वृक्षाच्या माध्यमातून मनुष्याला मोफत शुध्द ऑक्सिजन मिळत आहे. कोरोना काळात ऑक्सिजनचा झालेला तुटवडा यामुळे संपूर्ण जगाला ऑक्सिजन देणार्या झाडांचे महत्व पटले आहे. महापालिकेने आता शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी दिली.
मराठा पतसंस्थेच्या नूतन संचालकाकडून व्यापक काम होणे अपेक्षित...
