मराठा पतसंस्थेच्या नूतन संचालकाकडून व्यापक काम होणे अपेक्षित भगवानराव फुलसौंदर


। अहमदनगर । दि.30 एप्रिल । अहमदनगर जिल्हा मराठा नागरिक पतसंस्थेच्या  निवडणुकीत मराठा समाजातील जेष्ठ व्यक्तिमत्व इंजिनीयर विजयकुमार ठुबे यांच्या नेतृत्वाखाली जिजामाता सहकार पॅनल ला भरघोस यश मिळाले हा त्यांच्या एकजुटीचा विजय आहे आणि मतदारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास आहे असे प्रतिपादन माजी महापौर व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भगवानराव फुलसौंदर यांनी व्यक्त केले.

अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालकांचा सत्कार शुक्रवारी भगवानराव फुलसौंदर मित्र मंडळाच्या वतीने नक्षत्र लोन येथे आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की कोणत्याही समाजातील आर्थिक संस्थेची निवडणूक न होता सर्वांनी बसून संचालकांची निवड करणे गरजेचे असते आत्तापर्यंतचे होत आले पण यावेळी तसेच झाले नाही आता निवडणूक झाली आता पतसंस्थेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे तरच ही पतसंस्था लवकरच मोठी होईल निवडून आलेले सर्व संचालक हे समाजात काम करणारे असल्यामुळेच आणि सभासदांचा  नेतृत्वावर विश्वास असल्याने सर्व उमेदवार निवडून येऊ शकले या सर्वांचे अभिनंदन करतो.

यावेळी बोलताना संचालक उदय अनबुले म्हणाले की ज्या दिवशी मतमोजणी झाली आम्ही निवडून आलो त्याच दिवशी आमच्या बाजूने कटुता संपलेली आहे आमचा कोणावरही राग लोक नाही सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे कारण मराठा पतसंस्था ही समाजाची पतसंस्था आहे याचे भान आम्हाला आहे यावेळी मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

स्वागत संचालक सतीश इंगळे यांनी केले तर संचालक किशोर मरकड यांनी मानले. यावेळी मराठा सेवा संघाच्या जिजाऊ सृष्टीच्या ज्येष्ठ सदस्या इंजि. सुजाताताई ठुबे, नवनिर्वाचित संचालक लक्ष्मण सोनाळे, प्रा.किसन पायमोडे,ॲड.राजेश कावरे, डॉ.कल्पना ठूबे, डॉक्टर शरद ठुबे, ॲड.  रवींद्र शितोळे तारकराम झावरे, नगर तालुका पतसंस्थेचे चेअरमन सुदामराव मडके, अच्युत गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post