। अहमदनगर । दि.6 मे 2023 । महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीकडून 33 के. व्ही. मुळा डॅम विद्युत वाहिनीच्या देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी 6 मे रोजी सकाळी 10.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यत शट डाउन घेण्यात येणार आहे. तसेच सदर शटडाउन वेळेत अहमदनगर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ’अमृत’ पाणीपुरवठा योजनेची महत्वाची कामे कार्यरत शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
इंजि. विजयकुमार ठुबेंनी मराठा समाजाला दिशा देण्याचे काम केले : किरण काळे
महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरूस्तीची कामे 6 मे रोजी सकाळी 10.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यत घेण्यात येणार आहेत. दरम्यान काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.
शरद पवार यांनी राजीनामन्याचा निर्णय घेतला मागे
त्यामुळे 6 मे रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगरकल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास सकाळी 11.00 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. सदरचा पाणीपुरवठा हा 7 मे रोजी करणेत येईल
सक्षम व सुदृढ समाज निर्मितीसाठी मोफत शिबीर काळाची गरज : पो.नि. राजेंद्र सानप
तसेच 7 मे रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, आगरकर मळा, स्टेशन रोड, विनायकनगर, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणीपुरवठा हा 8 मे रोजी करण्यात येईल.
कामगारदिनी महावितरणच्या ६९ यंत्रचालक व तंत्रज्ञांचा गौरव
8 मे रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या, मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसून 9 मे रोजी करण्यात येईल.
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत नगर शहरातील झाडांच्या...
शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे.
