। मुंबई । दि.11 मे 2023 । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना नोटीस बजावण्यात आलीय असल्याची माहिती समोर येत आहे.
वाडेगव्हाण शिवारामध्ये गांजा शेतीवर छापा...
सोमवारी जयंत पाटील यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस या कंपनीतील व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता.
मराठा पतसंस्थेच्या चेअरमनपदी ...
आज राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ऐन निकालाच्या दिवशीच जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
