। अहमदनगर । दि.10 मे 2023 । येथील अहमदनगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमनपदी इंजि.विजयकुमार ठुबे तर व्हाईस चेअरमनपदी किशोर मरकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी संचालक ज्ञानदेव पांडूळे, ज्ञानेश्वर अनभुले, बाळकृष्ण काळे, सतीश इंगळे, द्वारकाधिश राजेभोसले, लक्ष्मणराव सोनाळे, बाळासाहेब सोनाळे, काशिनाथ डोंगरे, संभाजी मते, किसन पायमोडे, यशवंत शिंदे, कल्पना ठुबे, राजश्री शितोळे,
राजेश कावरे आदिंसह सरव्यवस्थापक अशोक वारकड, सह व्यवस्थापक बबन सुपेकर, रणजित रक्ताटे, प्रशांत बोरुडे, शशिकांत बोरुडे, दिलीप खर्डे, राजेंद्र ढोणे, अनुपमा भापकर, दिपमाला पवार आदि उपस्थित होते.
निवडणुक अधिकारी म्हणून रावसाहेब खेडकर यांनी काम पाहिले. चेअरमन पदासाठी इंजि. विजयकुमार ठुबे यांच्या नावाची सूचना बाळकृष्ण काळे यांनी केली, त्यास लक्ष्मण सोनाळे यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमन पदासाठी किशोर मरकड यांच्या नावाची सूचना संभाजी मते यांनी केली त्यास सतीश इंगळे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी रावसाहेब खेडकर म्हणाले की, मराठा पतसंस्थेने आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती केली आहे, यापुढील काळातही यापेक्षा अधिक जोमाने काम करतील. पतसंस्थेचा आर्थिक ताळेबंद व्यवस्थीत ठेवल्यास पतसंस्था कायम प्रगतीपथावर राहिल, असे सांगितले.
निवडीनंतर चेअरमन इंजि.विजयकुमार ठुबे म्हणाले, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. समाजाची आर्थिक स्थिती सुधरावी, नवउद्योजकांना भांडवल निर्माण व्हावे, सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण व्हावे यासाठी मराठा पतसंस्थेची स्थापना केली गेली. पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी आणि हितचिंतकांच्या अथक परिश्रमातून आज पतसंस्थेचा विस्तार होत आहे.
एक मजबूत स्थितीत पतसंस्था उभी आहे. निवडणुक हा औपचारिक भाग असल्याने निवडणुकीनंतर सर्वांना बरोबर घेऊन प्रगती साधण्याचा प्रयत्न नूतन संचालक मंडळ करेल असा विश्वास आहे. आज सर्वांनुमते माझ्यावर जी चेअरमनपदाची जबाबदारी टाकली आहे, ती सर्वांना बरोबर घेऊन पतसंस्थेच्या लौकिकात भर टाकण्याचे काम करु, असे सांगितले. यावेळी मावळते उपाध्यक्ष सतीश इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी काशिनाथ डोंगरे यांनी आभार मानले.
Tags:
Ahmednagar
