वाडेगव्हाण शिवारामध्ये गांजा शेतीवर छापा
। अहमदनगर । दि.11 मे 2023 । येथील शेवगांव तालुक्यातील वाडगव्हाण शिवारामध्ये गांजा शेतीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून 2 लाख 50 हजार 500 रुपये किंमतीची 335 लहान मोठी गांजाची झाडे जप्त करून एकावर शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
मराठा पतसंस्थेच्या चेअरमनपदी इंजि. विजयकुमार ठुबे
माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली की, शेवगांव तालूक्यातील वाडगव्हाण शिवारामध्ये अशोक काजळे याने त्याचे शेतामध्ये बेकायदेशिररित्या गांजाच्या झाडांची लागवड केलेली आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत ...
यावर पोलिसांनी खात्री करुन मक्याचे शेतामध्ये गांजाची झाडे दिसुन आल्याने त्या ठिकाणी छापा टाकुन अशोक सुदाम काजळे (रा.वाडगव्हाण, ता. शेवगांव) याचे शेतामधुन 2 लाख 50 हजार 500 रुपये किंमतीच्या गांजाची 335 लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त केली.
दोन महिलांनी पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविले
या प्रकरणी शेवगाव पोलिसानी पोलिस नाईक संतोष लोढे यांचे फिर्यादी वरुन एन. डी. पी. एस. कायदा कलम 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक,.स्वाती भोर , पोलीस उप अधिक्षक संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
