। अहमदनगर । दि.28 एप्रिल । महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानद कर्नलपद प्रदान करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 2 मे, 2023 रोजी विद्यापीठात होणार्या दिमाखदार सोहळ्यात अतिरिक्त महासंचालक, मेजर जनरल वाय.पी. खांदुरी यांच्या हस्ते कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना बॅटन, सन्मानपत्र व कर्नलपद प्रदान करण्यात येणार आहे.
याप्रसंगी औरंगाबाद येथील ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर यु.के. ओझा, अहमदनगर कॅन्टॉमेन्ट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, अहमदनगर 17 महाराष्ट्रीयन बटालीयनचे कमांडींग ऑफिसर कर्नल चेतन गुरबॅक्स, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलसचिव प्रमोद लहाळे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, नियंत्रक विजय पाटील, लेफ्ट. सुनिल फुलसावंगे उपस्थित असणार आहेत. या कृषि विद्यापीठातील हे पाचवे कुलगुरु आहेत ज्यांना कर्नलपदाने सन्मानीत करण्यात येणार आहे अशी माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी दिली.
------
📌 नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सरासरी 98 टक्के मतदान
📌 नगरमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, हल्ल्यात शिक्षिका झाली जखमी
📌 देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
