नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सरासरी 98 टक्के मतदान

। अहमदनगर । दि.28 एप्रिल । नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागांसाठी होत असलेल्या चुरशीच्या मतदान प्रक्रियेत सरासरी  98.92 टक्के मतदान झाले आहे. बाजार समितीसाठी कर्डिले-कोतकर यांच्याविरोधात महाविकास आघाडी अशी समोरासमोर लढत होत आहे.

दरम्यान, उत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी तोफखाना पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे समोर येत आहे. दोन्ही गटाने सामंजस्य भूमिका घेतल्याने मतदान त्यानंतर सुरळीत पार पडले.

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 16 जागांसाठी होत असलेल्या चुरशीच्या मतदान प्रक्रियेत सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सरासरी 98.40 टक्के मतदान झाले होते. यामध्ये सोसायटीत मतदारसंघात 99.00, ग्रामपंचायत मतदारसंघात 98.81 टक्के तर हमाल मापाडी मतदासंघात 98.53 टक्के मतदान झाले.

मतदार आकडेवारी अहवाल जिल्हा अहमदनगर खालील प्रमाणे

अहमदनगर 98.92 टक्के
संगमनेर 96.88 टक्के
श्रीगोंदा 98.06 टक्के
राहुरी 98.71 टक्के
पारनेर 98.31 टक्के
कर्जत 98.45 टक्के
पाथर्डी 96.77
टक्के

Post a Comment

Previous Post Next Post