। अहमदनगर । दि.28 एप्रिल । सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात येणार्या भव्य नाट्य संकुलाच्या आवारात मनपाच्या कचरा संकलनाच्या गाड्या लावल्या जातात व त्यामुळे तेथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. याचा फटका एका शिक्षिकेला बसला.
मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ही शिक्षिका जखमी झाल्याची घटना प्रोफेसर चौकातील कचरा संकलन केंद्राजवळ घडली. या हल्ल्यात शिक्षिकेच्या पायाला गंभीर इजा झाली असून, जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले.
श्रुती राहुल मुळे (वय 24) असे या जखमी शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेमुळे मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासह प्रोफेसर चौकातील कचरा संकलन केंद्राचा विषयही पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मनपा प्रशासन झोपलय का?
महानगरपालिका सभेमध्ये कुत्र्यांचा विषय मध्यतरी गाजला होता, महानगरपालिका प्रशासन नेमके काय करत आहे हे आता त्यांनीच नागरीकांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. कुत्रे पकडण्यासाठी ठेकेदार संस्था निश्चित करण्यात आली होती त्याचे काय झाले? कुत्रे पकडण्यासाठी वारंवार नागरीकांची मागणी होत आहे. मात्र या प्रश्नाकडे मनपा प्रशासन सोईस्कर डोळेझाक करत आहे. यातुन नेमके शहरात चालले काय ? आणि प्रशासन यावर निर्णय का घेत नाही असाच प्रश्न नागरीकांना पडला आहे.
Tags:
Ahmednagar
