। अहमदनगर । दि.30 एप्रिल । भारतीय हवामान खात्याने नगर जिल्हयात 29 एप्रिल ते 2 मे या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, गारपीट व मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. नागरीकांनी वादळी वारे, वीज, गारपीट आणि पाऊस यापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
शिवभोजन थाळीची रोखलेली बिले त्वरित न दिल्यास ...
मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे.
बियाणे, खत उपलब्धेसाठी जिल्ह्यात १५ भरारी पथकांसह...
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणार्या केबल्स पासून दूर रहावे. विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांमध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व वादळी वारा, गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.
देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
शेतकर्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
