आयपीएल सामन्यावर सट्टा घेणार्‍यास पकडले

। अहमदनगर । दि.28 एप्रिल । आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा मोबाईलवरुन घेणारा वडाळा बहिरोबा (ता. नेवासा) येथील एकास 13 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मनोहर गोसावी, संदीप पवार, पोना सचिन आडबल, पोकॉ शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आता भाकरी फिरवायची वेळ आली : शरद पवारांकडून सूचक विधान 

पोनि आहेर यांना माहिती मिळाली की, माळीचिंचोरा (ता. नेवासा) येथे एक इसम त्याच्या मोबाईलवर ऑनलाईन साईटवर आयपीएल क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावुन सट्टा खेळत व खेळवित आहे. पोनि आहेर यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता एकजण उघडयावर बसुन त्याच्या मोबाईल फोनवर व वहीमध्ये आकडेमोड करताना दिसला.पथकाची खात्री होताच त्यास जागीच पकडले. 

नितेश राणेंविरोधात आंबेडकरी जनतेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी 

साजिद उस्मान पठाण (वय 32, रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मोबाईल फोनमध्ये आयपीएल किकेट मॅचवर सट्टा लावुन गेम खेळत असल्याचे दिसुन आल्याने त्यास हातातील वही व मोबाईल फोनसह ताब्यात घेतले. अंगझडतीत 13 हजार रुपये किंमतीचा मोबाईल, रोख रक्कम व आकडेमोड केलेली वही मिळुन आली. पोना सचिन आडबल यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार चळवळीला भक्‍कम पाठबळ दिले 

Post a Comment

Previous Post Next Post