। अहमदनगर । दि.15 ऑक्टोबर । येथील मुळा पाटबंधारे कार्यालयाचे वतीने भारताचे माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने मराठी पुस्तकांचे वाचन होण्याकरिता गोडी निर्माण होण्यासाठी मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर यांचे वतीने आज दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय कार्यालयामध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांना थोर राष्ट्रभक्त, विचारवंत, क्रांतिकारक, समाज सुधारक यांची चरित्रे भेट म्हणून देण्यात आली.यावेळी कार्यकारी अभियंता सायली पाटील,उपकार्यकारी अभियंता अकोलकर, शाखा अभियंता श्रीमती कापडणीस यांचे सह विभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Tags:
Maharashtra

