सीना नदीला पूर ; कल्याण रस्त्यावरील वाहतूक ठप्प

। अहमदनगर । दि.20 ऑक्टोबर । अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे नगर- कल्याण रस्ता पुन्हा ठप्प झाला आहे. अचानक आलेल्या पुरामुळे परिसरातील घरात पाणी शिरले. तर पुलावरून धोक्याच्या पातळीवर पाणी वाहत असल्याने पाण्यात गाडी घालण्यास कोणताही गाडी चालक धजावत नव्हता. यामुळे पूर्ण कल्याण रस्तावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे सीना नदी वरच्या पुलावर पाणी आले.नगर कल्याण रोड वरील वाहतूक ठप्प झाली आहे.यंदाच्या पावसाळ्यात नगर कल्याण रोडवरील पुलावर पाणी आल्याने कल्याण रस्ता दहा ते पंधरा वेळा बंद होता. 

यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.सीना नदीवरील माती परीक्षण होऊन एक वर्ष उलटले तरी पुलाचे काम सुरू होत नाही.यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने कल्याण रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सीना नदीवरील पूल बांधावा.अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

काल रात्री झालेल्या पावसामुळे सीना नदीला अचानक पूर आला आहे. नगरमध्ये सर्वात रस्ता खड्ड्यांमुळे खराब आहे.असे असतानाच पुरामुळे कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.कल्याण रोड वरील वाहतूक लिंक रोड मार्गे, रंगोली हॉटेल,सक्कर चौक मार्गे शहरात वळवली आहे.

उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने केडगाव महामार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे.वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून वाहतुकीला पर्याय नसल्याने रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.नागरिकांना वाहतुकीचा सामना करावा लागत आहे.                             

Post a Comment

Previous Post Next Post